LPG Price Hike : गॅस सिलेंडरच्या दरांचा पुन्हा भडका! केंद्राचा इशारा; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात नुकतीच वाढ झाल्यानंतर आता भविष्यात गॅस सिलेंडर आणखी महाग होण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे एलपीजीच्या किंमतींवर मोठा दबाव निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. (LPG Price Hike)


केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वाढत्या दरांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (LPG Price Hike)



जागतिक संकटामुळे पुरवठा साखळी कोलमडली :


दरवाढीमागील कारण स्पष्ट करताना प्रल्हाद जोशी म्हणाले, "गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही दुःख होते. मात्र, सध्या जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे आणि वाहतुकीतील अडचणींमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे." (LPG Price Hike)


त्यांनी पुढे सांगितले की, एलपीजीचा पुरवठा आता मर्यादित स्रोतांवर अवलंबून राहिला आहे. गॅसची मूळ किंमत वाढली असून, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. सध्या अनेक मार्गांवर वाहतुकीसाठी ४० ते ४५ दिवस लागत असून, त्यामुळे वाहतूक आणि विमा खर्चात मोठी वाढ झाली आहे. (LPG Price Hike)



सरकारचा नाईलाज, जनतेची चिंता :


"सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींबाबत सरकार तितकेच संवेदनशील आहे. मात्र, जागतिक परिस्थिती आणि वाढलेले खर्च लक्षात घेता काही निर्णय घेणे अपरिहार्य ठरत आहे," असेही जोशी यांनी स्पष्ट केले. (LPG Price Hike)



७ जूनला २९ रुपयांची वाढ :


दरम्यान, ७ जून रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी व्यावसायिक वापराच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि खाद्य व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. आता घरगुती सिलेंडरचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गृहिणींसह सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (LPG Price Hike)

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर