Worli Concert Youth Dies: वरळी कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; 'या' कारणामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल






मुंबई: मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या २८ वर्षीय तरुणाच्या मृत्यू (Death) प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार मृत तरुणाच्या शरीरात मद्याचा कोणताही अंश आढळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अति मद्यपानामुळे मृत्यू झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या 'क्लांगकुएन्स्टलर ऑल नाईट' या संगीत कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तरुणांनी उपस्थिती लावली होती. वकिलीचे शिक्षण घेत असलेला रुशील गांगुर्डे हा मित्रांसोबत कार्यक्रमासाठी आला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रचंड गर्दी आणि घुसमटीमुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


प्राथमिक तपासात रुशीलच्या शरीरात मद्याचे कोणतेही अंश आढळले नसल्याने कोंदट वातावरण, प्रचंड गर्दी आणि गुदमरल्यामुळे आलेला हृदयविकाराचा झटका हे मृत्यूमागील संभाव्य कारण असू शकते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


या कार्यक्रमासाठी सुमारे ६ हजार प्रेक्षक उपस्थित होते. तपासादरम्यान कार्यक्रमस्थळी पुरेशी वातानुकूलन व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आयोजकांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेची माहिती आयोजकांनी पोलिसांना दिली नव्हती. पोलिसांना मृत्यूबाबतची माहिती थेट रुग्णालयाकडून मिळाली. यानंतर वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणात आतापर्यंत २० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून आयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन