Congress : राज्यसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द

भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजपकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निर्धारित मुदतीत कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अर्जामध्ये आवश्यक माहिती लपविण्यात आल्याचे आढळून आल्याने तांत्रिक कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.



या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस पक्षाची स्पर्धा आता संपुष्टात आली आहे. या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी याला "लोकशाहीची हत्या" असे संबोधले. कायदे आणि नियमांकडे दुर्लक्ष करून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सिंघार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवारांनी स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असले, तरी केवळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या प्रकरणाच्या आधारे अशी कारवाई करणे नियमबाह्य आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागणार असून हा मुद्दा जनतेसमोरही मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने