Ahilyanagar Crime : शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; नेम चुकल्याने थोडक्यात बचावले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?






अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरामपुरात शिवसेना (शिंदे गट) (Shinde Shivsena) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे (Prashant Kahane) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने कहाणे थोडक्यात बचावले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.Crime News


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास गोंधवणी परिसरात ही घटना घडली. प्रशांत कहाणे हे आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.



गोळी गाडीच्या दिशेने झाडण्यात आली होती, मात्र नेम चुकल्यामुळे कहाणे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हल्लेखोर गोळीबारानंतर घटनास्थळावरून फरार झाले.


घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.


प्रशांत कहाणे यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. राजकीय वाद, वैयक्तिक कारण किंवा इतर कोणता हेतू याचा तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, भररस्त्यात राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे श्रीरामपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.










Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,