Navneet Rana : भाजपसोबतच राहणार! नवनीत राणांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव फेटाळला; राज्यसभा चर्चांना दिला पूर्णविराम

अमरावती : माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सोशल मीडियावरील फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी कटिबद्ध असून भविष्यातही भाजपचे कार्य प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


फेसबुक पोस्टमध्ये राणा (Navneet Rana) यांनी म्हटले आहे की, “मी भाजपाची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती आहे. कोणत्याही पदासाठी किंवा राजकीय संधीसाठी माझी विचारधारा बदलणार नाही. भविष्यातही भाजपचे कार्य प्रामाणिकपणे करत राहीन.”


गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या (Navneet Rana) संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभार मानले. दोघांनीही त्यांना राज्यसभेवर पाठविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट असल्याचे समोर आले होते.



नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ही अट स्वीकारण्यास नकार देत संबंधित प्रस्ताव नम्रपणे फेटाळल्याचे संकेत दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेच्या जागेसंदर्भात प्रयत्न करताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन संबंधित जागा भाजपला देण्याची विनंती केली होती. मात्र, विविध राजकीय कारणांमुळे तो पर्याय शक्य झाला नाही.


सदर राज्यसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे असल्याने ती भाजपला देण्यास नकार देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास उमेदवारी देण्याचा प्रस्ताव समोर आला. मात्र, पक्षांतर करण्याऐवजी आपल्या राजकीय भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजपसोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला.



दरम्यान, या फेसबुक पोस्टनंतर राज्यसभा निवडणूक आणि आगामी राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चांना नव्याने उधाण आले असून, नवनीत राणा यांच्या भूमिकेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Navneet Rana)


Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली