BMC News : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १४ कंत्राटदारांची निवड, यंदा केवळ ४२ कोटींचीच कामे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्यांवर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्डयांची समस्या मोठ्याप्रमाणात कमी झाली आहे. पर्यायाने यावरील खर्चाचा भारही कमी झाला आहे. जिथे खड्डयावर दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येत होते, तिथे यंदा फक्त पावसाळ्यात संभाव्य निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी केवळ ४२ कोटी रुपये खर्च जाणार आहेत. यासाठी प्रत्येक परिमंडळांमध्ये कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने रस्त्यांवरील खराब भागांवर निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक परिमंडळांमध्ये ९ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे रस्ते आणि ९ मीटर पेक्षा कमी रुंदीचे असे असे वर्गीकरण करून त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदारांनी महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के उणे दराने बोली लावून हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उणे दराने हा प्रस्ताव आल्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.



परिमंडळ निहाय नियुक्त करण्यात आलेले कंत्राट कंपन्या


परिमंडळ -१ मधील 'ए', 'बी', 'सी', 'डी' आणि 'ई' विभागातील ९ मीटरपेक्षा जास्त


कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.३३ कोटी रुपये


परिमंडळ -१ मधील 'ए', 'बी', 'सी', 'डी' आणि 'ई' विभागातील ९ मीटरपेक्षा कमी


कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.०७ कोटी रुपये


 

परिमंडळ -२ मधील 'एफ/दक्षिण', 'एफ/उत्तर', 'जी/दक्षिण', आणि 'जी/उत्तर' विभागातील ९ मीटर पेक्षा जास्त


कंत्राटदार : मानष कंस्ट्रक्शन, कंत्राट किंमत : ३.२३ कोटी रुपये


परिमंडळ -२ मधील 'एफ/दक्षिण', 'एफ/उत्तर', 'जी/दक्षिण', आणि 'जी/उत्तर' विभागातील विभागस्तरावर ९ मीटरपेक्षा कमी


कंत्राटदार : व्हि.जे.कॉर्पोरेशन, कंत्राट किंमत : ३.१६ कोटी रुपये




 


परिमंडळ ३ मधील 'एच/पूर्व', 'एच/पश्चिम', 'के/पूर्व' विभागातील ९ मीटर पेक्षा जास्त


कंत्राटदार : भारत कंस्ट्रक्शन कंपनी, कंत्राट किंमत : २.७९ कोटी रुपये


परिमंडळ ३ मधील 'एच/पूर्व', 'एच/पश्चिम', 'के/पूर्व', विभागातील विभागस्तरावर ९ मीटर पेक्षा कमी


कंत्राटदार : व्हि.जे.कॉर्पोरेशन, कंत्राट किंमत : २.६० कोटी रुपये


 

परिमंडळ -४ मधील 'के / पश्चिम', 'पी/दक्षिण', 'पी/उत्तर' विभागातील ९ मीटर पेक्षा जास्त


कंत्राटदार : इन्फायनाईट दि टोटल सोल्युशन, कंत्राट किंमत : ३.३९ कोटी रुपये


परिमंडळ-४ मधील 'के/पश्चिम', 'पी/दक्षिण', 'पी/उत्तर' विभागातील विभागस्तरावर ९ मीटर पेक्षा कमी


कंत्राटदार : सी.आर.शाह, कंत्राट किंमत : २.९७ कोटी रुपये



परिमंडळ -५ मधील 'एल', 'एम/पूर्व' आणि 'एम/पश्चिम' विभागातील ९ मिटरपेक्षा जास्त


कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : ४.३२ कोटी रुपये


परिमंडळ -५ मधील 'एल', 'एम/पूर्व' आणि 'एम/पश्चिम' विभागातील ९ मिटरपेक्षा कमी


कंत्राटदार : सीआर शाह, कंत्राट किंमत : ३.८३ कोटी रुपये



परिमंडळ ६ मधील 'एन', 'एस' आणि 'टी' विभागातील ९ मिटरपेक्षा जास्त


कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : ३.३१ कोटी रुपये


परिमंडळ -६ मधील 'एन', 'एस' आणि 'टी' विभागातील ९ मिटरपेक्षा कमी


कंत्राटदार : सी.आर.शाह, कंत्राट किंमत : ३.१२ कोटी रुपये


 

परिमंडळ ७ मधील 'आर/वक्षिण', 'आर/मध्य', 'आर/उत्तर' विभागातील ९ मीटर पेक्षा जास्त


कंत्राटदार : रणुजा देव कॉर्पोरेशन, कंत्राट किंमत : २.६१ कोटी रुपये


परिमंडळ ७ मधील 'आर/दक्षिण', 'आर/मध्य, 'आर/उत्तर' विभागातील विभागस्तरावर ९ मीटर पेक्षा कमी


कंत्राटदार : विकाश एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.३६ कोटी रुपये

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर