Pune Crime : पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा भंडाफोड; चिनी ॲपच्या माध्यमातून सुरू होता काळा धंदा

पुणे :  पुण्यात (Pune) उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटने (Abortion racket) राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली असून, गर्भलिंग निदानासाठी एका चिनी ॲपचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या रॅकेटचे धागेदोरे पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर आले आहे.


मार्च महिन्यात शिरूर तालुक्यात बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. त्याच्या मोबाईलची तपासणी करताना गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे एक संशयास्पद चिनी ॲप आढळून आले. याचबरोबर काही विशेष उपकरणांच्या मदतीने नियमबाह्य पद्धतीने गर्भपात शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहितीही समोर आली.



तपासादरम्यान या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार दौंड तालुक्यातील केडगाव येथील अण्णा गिरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाने विविध सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली. एका खासगी रुग्णालयातील नोंदींची पडताळणी करताना बार्शी, करमाळा आणि आळंदी परिसरातील काही महिलांनी तेथे गर्भपात केल्याचे समोर आले. त्यामुळे या रॅकेटचे जाळे अनेक जिल्ह्यांमध्ये पसरल्याचा संशय अधिक बळावला आहे.


मुख्य आरोपी अण्णा गिरी हा कोंढवा परिसरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या कथित गैरप्रकारांची माहिती संबंधित यंत्रणांना असतानाही त्याच्यावर वेळीच कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी काही डॉक्टर, दलाल आणि रुग्णालयांचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील आरोग्य यंत्रणा आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी