Navnath Ban : संजय राऊतांनी उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी घेतली

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात


Mumbai : आजवर संजय राऊत यांच्या जे पोटात होते ते ओठावर यायला लागले आहे. उबाठा गट म्हणून आमचे वेगळे अस्तित्व असल्याचे सांगणाऱ्या संजय राऊत यांनी आज तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केले पाहिजेत असे वक्तव्य केले. उबाठा गट, राष्ट्रवादी पवार गट संपवून फक्त काँग्रेसच जिवंत ठेवायची सुपारी संजय राऊत यांनी राहुल गांधींकडून घेतली आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.


संजय राऊत नेहमी खोटे बोलतात. मात्र उबाठा गटाचे दहा खासदार हे उबाठा सोडून जाणार आहेत हे त्यांचे वक्तव्य खरे होणार आहे. लोकसभेत त्यांचे नऊ खासदार आहेत आणि दहावे खासदार स्वतः संजय राऊत राज्यसभेत आहेत. त्यामुळे हे दहाच्या दहा खासदार उद्धव ठाकरे आणि उबाठा गट सोडून वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाणार आहेत. काही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत तर काही संजय राऊतांसोबत काँग्रेसमध्ये जातील, असे श्री. बन यांनी सांगितले.नारी सन्मान योजना किंवा नारी शक्ती वंदन अभियानाबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत  बन म्हणाले, ज्या असभ्य भाषेत तुम्ही नारी सन्मानाबद्दल वक्तव्य करता ते पाहून जनतेनेच तुमची घंटा वाजवलेली आहे. तुमचे अस्तित्व नाकारत तुम्हाला पूर्ण झोपवले आहे. ज्या पाटकर ताईंचे एक पुस्तक येणार म्हणून त्यांना धमक्या देणारे, शिव्या देणारे तुम्ही. तुम्हाला नारी सन्मानाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांसाठी न्यायाधीश, न्यायमूर्ती वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अभ्यास करत असतात, असे सांगू नवनाथ बन म्हणाले की, हे काँग्रेससह वेगवेगळे सरकार असतानाच्या काळातही झाले आहे. मात्र पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा उद्धव ठाकरे कुठल्या शहरामध्ये गेले होते? तुम्हाला पहलगाममधल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही वेळ नव्हता. कारण तुम्ही सहकुटुंब लंडनवारी करत होता. लंडनवारीच्या गप्पा करणाऱ्या राऊतांनी याबद्दल एकदा पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी आणि नंतर न्यायाधीश लंडनमध्ये जातात की न्यूयॉर्कमध्ये याबद्दल बोलावे.



मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता


लातूरमध्ये एका शेतकऱ्यांकडे बैल नसल्याने स्वतःच्या पत्नीला नांगराला जुंपण्याची दुर्दैवी वेळ आली. या अतिशय संवेदनशील घटनेची बातमी पाहून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. देवेंद्रजी फडणवीस यांच्या तत्परतेमुळे त्या शेतकऱ्याला मदत मिळत बैल उपलब्ध झाला. राज्यात अशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्यावर दुर्दैवी वेळ आली तर हे सरकार मदतीला धावून जाते. उद्धव ठाकरे यांनी फसवी कर्जमाफी योजना केली होती. कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना वीज देण्याचे काम केले. कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा भाऊ कोण असेल ते तर देवाभाऊ आहेत, असेही श्री. बन यांनी सांगितले.


Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या