पीओकेमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; 21 सैनिकांचा मृत्यू

Pakistan Army Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकव्याप्त मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे एमआय-17 (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना (Pakistan Army Helicopter Crash) घडली आहे. हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह सर्वच 21 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह 21 सैनिक असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे पाकिस्तान लष्करामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



उड्डाण घेतानाच तांत्रिक बिघाड


प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर पाकव्याप्त काश्मीरमधील ‘नीलम व्हॅली’ भागात अतिरिक्त जवानांना घेऊन जात होते. याचदरम्यान, मुझफ्फराबादजवळ उड्डाण घेत असतानाच अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने परिस्थिती नियंत्रणात आणत आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि हेलिकॉप्टर कोसळून हा प्रघात झाला. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले होते.



घटनास्थळी मदतकार्य सुरु


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि लष्कराच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली असून मदतकार्य वेगात सुरु आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हेलिकॉप्टरमधील सर्व जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अद्याप मृत जवानांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.


दरम्यान, या भीषण अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान लष्कराने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात असले, तरी घातपातासह सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे