Ben Stokes : नाईटक्लब वादानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय; बेन स्टोक्सचे कर्णधारपद गेले, दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर

लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या नाईटक्लब वादानंतर आता इंग्लंड बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन याच्यांवर कठोर कारवाई केली आहे. या दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बेन स्टोक्सचे कर्णधारपद काढण्यात आले आहे.न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन यांचा समावेश करण्यात आलेला नाही.त्यांच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज जो रूट याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. दुसरा कसोटी सामना १७ ते २१ जून दरम्यान खेळला जाणार आहे.



इंग्लंड बोर्डाची कठोर कारवाई !


ईसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाईटक्लबमध्ये घडलेल्या वादाच्या चौकशीमुळे स्टोक्स आणि अॅटकिन्सन या दोघंना संघातून बाहेर करण्यात आले आहे.चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फलंदाज जॉर्डन कॉक्स यांना संघात संधी देण्यात आली आहे.





नेमकं प्रकरण काय?


माध्यमांच्या वृत्तानुसार, लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडवर ११५ धावांनी विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन एका नाईटक्लबमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एका रग्बी खेळाडू आणि त्याच्या सहकाऱ्यांशी वाद झाला. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर, ईसीबीने शिस्तभंग आणि सांघिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. आता दोन्ही खेळाडूंना संघातून काढून टाकण्यात आले आहे.



स्टोक्सच्या भविष्यबाबत चर्चांना उधाण


काही इंग्लिश माध्यमांच्या वृत्तानुसार, या वादानंतर बेन स्टोक्स कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचाही विचार करू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र याबाबत स्टोक्स किंवा ईसीबीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या