'Deool Band 2' Box Office Collection : ‘देऊळ बंद २’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई! रितेश देशमुखच्या ‘वेड’ला टाकलं मागे

- २० व्या दिवशीही कमाईचा जोर कायम


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२६ हे वर्ष सुवर्णकाळ ठरत असून बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची जोरदार घोडदौड सुरू आहे. या यशस्वी चित्रपटांच्या यादीत आता ‘देऊळ बंद २’ने आपले नाव ठळकपणे नोंदवले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत. ('Deool Band 2' Box Office Collection)


सामाजिक आशय, रहस्य, थरार आणि श्रद्धा-अंधश्रद्धेच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘देऊळ बंद २’ हा लोकप्रिय ‘देऊळ बंद’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर त्याची विजयी घोडदौड कायम आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)



२० व्या दिवशीही कमाईचा जोर कायम :


१० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘देऊळ बंद २’ने प्रदर्शनाच्या २० व्या दिवशी १.१० कोटी रुपयांची कमाई केली. १९ व्या दिवसाच्या तुलनेत कमाईत किरकोळ ४.३४ टक्के घट झाली असली तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पकड अजूनही मजबूत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत चित्रपटाने ६२ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन आणि ७३.१६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ७५ कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)



आठवड्यानुसार कमाई :


‘देऊळ बंद २’च्या कमाईचा आलेख सातत्याने वर चढताना दिसत आहे.


पहिला आठवडा – ३०.२ कोटी रुपये
दुसरा आठवडा – २२.४ कोटी रुपये
१६ वा दिवस – १.४ कोटी रुपये
१७ वा दिवस – २.६ कोटी रुपये
१८ वा दिवस – ३.१५ कोटी रुपये
१९ वा दिवस – १.१५ कोटी रुपये
२० वा दिवस – १.१० कोटी रुपये ('Deool Band 2' Box Office Collection)



मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट :


या चित्रपटाने आता मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘वेड’च्या ६१.२ कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकत ‘देऊळ बंद २’ मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत सध्या ‘राजा शिवाजी’ १०५.६४ कोटी रुपयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ‘सैराट’ (९० कोटी) आणि ‘बाईपण भारी देवा’ (७६.२८ कोटी) यांचा क्रमांक लागतो. आता ६२ कोटी रुपयांच्या कमाईसह ‘देऊळ बंद २’ चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)



प्रेक्षकांसह समीक्षकांचाही भरभरून प्रतिसाद :


चित्रपटातील मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच प्रवीण तरडे यांच्या प्रभावी दिग्दर्शनाचेही कौतुक होत आहे. समाजातील वास्तवावर भाष्य करताना मनोरंजनाचा समतोल साधण्यात चित्रपट यशस्वी ठरल्याचे मत प्रेक्षक आणि समीक्षक व्यक्त करत आहेत. कमाईचा वेग पाहता ‘देऊळ बंद २’ लवकरच ‘बाईपण भारी देवा’च्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो, अशी चर्चा चित्रपट वर्तुळात रंगू लागली आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’