Suraj Chavan : गुड न्यूज! सूरज चव्हाणच्या घरी येणार चिमुकला पाहुणा! 'बिग बॉस मराठी' विजेत्याने दिली गोड बातमी

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच सूरजने स्वतः सोशल मीडियावर खास व्हिडिओ (Video) शेअर करत तो बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


डिसेंबर महिन्यात सूरज आणि संजना यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून संजना गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. काही फोटो आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.



दरम्यान, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने संजनाच्या चोरओटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला. अखेर सूरजने स्वतःच ही आनंदाची बातमी जाहीर करत चाहत्यांची उत्सुकता संपवली.


आपल्या खास 'झापूक झुपूक' स्टाईलमध्ये व्हिडिओ शेअर करत सूरज म्हणाला, "नमस्कार, जय महाराष्ट्र... तुमचा सूरज भाऊ आज खूप खुश आहे. तुमचा टॉपचा किंग बाबा होणार आहे. देणार धब्बा, टॉपचा किंग होणार पप्पा!"



सूरजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लवकरच आई-बाबा होणाऱ्या सूरज आणि संजना यांच्या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’