Iran - America War : ट्रम्प यांची इराणला थेट युद्धाची धमकी! ‘आज रात्री मोठा हल्ला करू’; तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचाही दावा

पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेत मोठ्या लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी आज रात्री इराणवर मोठा हल्ला केला जाईल, असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. (Iran - America War)


ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, इराणच्या नौदल, हवाई दल, रडार यंत्रणा, हवाई संरक्षण प्रणाली आणि लष्करी क्षमतेचा मोठा भाग आधीच निष्प्रभ करण्यात आला आहे. याशिवाय भविष्यात इराणमधील खार्ग बेटासह महत्त्वाच्या तेल आणि गॅस पायाभूत सुविधांवर नियंत्रण मिळवण्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे या संघर्षाचे परिणाम केवळ लष्करीच नव्हे तर जागतिक ऊर्जा बाजारावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Iran - America War)



अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे प्रत्युत्तर :


दरम्यान, अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नेही आक्रमक भूमिका घेतली आहे. आयआरजीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेशी संबंधित अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. (Iran - America War)


इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करत सर्व व्यापारी आणि लष्करी जहाजांना त्या भागापासून दूर राहण्याचा इशाराही दिला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत अमेरिकेच्या 18 प्रमुख लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून कुवेतमधील अली अल-सलेम आणि अहमद अल-जाबेर हवाई तळ तसेच बहरीनमधील शेख ईसा हवाई तळ यांचा समावेश आहे. (Iran - America War)



टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा :


संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाने १० जून रोजी ‘यूएसएस मायकेल मर्फी’ या युद्धनौकेवरून इराणकडे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच ओमानच्या किनाऱ्याजवळील एमटी जलवीर या तेलवाहू जहाजावरही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, हे जहाज इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करून तेल वाहतूक करत होते. नौदलाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे या जहाजावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (Iran - America War)



जागतिक बाजाराचे लक्ष संघर्षाकडे :


अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजार, समुद्री व्यापार मार्ग आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होत असल्याने या मार्गावरील कोणताही अडथळा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो.या पार्श्वभूमीवर जगभरातील देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संघर्ष आणखी तीव्र झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Iran - America War)

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.