JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालक शाहीद शेख फारुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संशयित सध्या फरारी आहे.




काय आहे प्रकरण?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची धुळे येथील रहिवासी असून ती जळगावात एका नातेवाइकाकडे आली होती. याच दरम्यान सुप्रीम कॉलनीतील रहिवासी असलेल्या शाहीद शेख फारुख याची तिच्याशी ओळख झाली. शाहीदने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले. १७ एप्रिल २०२४ ते १ मे दरम्यान संशयिताने पीडितेस जळगाव आणि धुळ्यातील विविध ठिकाणी, तसेच देवपूरमधील एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.



लग्नाला नकार आणि फसवणूक


गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, तरुणीने शाहीदकडे लग्नाचा तगादा लावला, तेव्हा त्याने लग्नास स्पष्टपणे नकार दिला आणि पीडितेसोबत वाद घालत तिला मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने सोमवारी (ता. ८) एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.



दोघेही विवाहित?


या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपी शेख शाहीद फारुख हा आधीच विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. तसेच, तक्रारदार पीडित तरुणीचेही लग्न झालेले असून तिला दोन अपत्ये असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.



पोलिसांचा तपास सुरू


पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी शाहीद शेख फारुख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संशयित आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी