Nikhil Choudhary : दिल्लीत जन्मलेल्या निखिल चौधरीची ऑस्ट्रेलिया संघात एन्ट्री !देशाबाहेर खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादित आणखी एका नावाची भर...

मुंबई: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. त्यात एका भारतीय खेळाडूचा समावेश केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. दिल्लीत जन्मलेल्या निखिल चौधरीला ऑस्ट्रेलियन संघारडून खेळण्याची संधी मिळाली आहे. ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूला ट्रेव्हिस हेडच्या जागी संघात स्थान देण्यात आले असून, तो पदार्पणाची संधी मिळाल्यास ६० वर्षांहून अधिक काळानंतर ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा भारतात जन्मलेला पहिला पुरुष क्रिकेटपटू होईल. निखिल चौधरीचा जन्म दिल्लीत झाला होता, मात्र त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. त्याने तीथे क्रिकेट व्यवस्थेतून प्रगती करत होबार्ट हरिकेन्स संघाकडून बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे तो यापूर्वी आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचाही भाग राहिला होता.(sports)



17 जूनला ऑस्ट्रेलियनकडून पदार्पणाची संधी


ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेला 17 जूनपासून सुरुवात होणार आहे. चट्टोग्राम येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात निखिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. अस झाल्यास ,तो ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा भारतात जन्मलेला पहिला पुरुष खेळाडू होईल.





भारतात जन्मले, पण दुसऱ्या देशासाठी खेळलेले क्रिकेटपटू


क्रिकेटच्या इतिहासात भारतात जन्मलेले अनेक खेळाडू इतर देशांचे प्रतिनिधित्व करताना दिसले आहेत.



1.निखिल चौधरी (ऑस्ट्रेलिया)


दिल्लीत जन्मलेला निखिल आता ऑस्ट्रेलियन संघाच्या उंबरठ्यावर उभा आहे.



2.इश सोधी (न्यूझीलंड)


पंजाबमधील लुधियानात जन्म. नंतर कुटुंबासह न्यूझीलंडमध्ये स्थलांतर. आज न्यूझीलंडच्या प्रमुख फिरकीपटूंमध्ये गणना.



3.रचिन रवींद्र (न्यूझीलंड)


बंगळुरूशी कौटुंबिक नाळ असलेला रचिन न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्याचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावांवरून ठेवण्यात आले आहे.



4.माँटी पनेसर (इंग्लंड)


पंजाबी कुटुंबातून आलेला माँटी इंग्लंडचा स्टार डावखुरा फिरकीपटू ठरला.



5.सॅम करन, टॉम करन आणि बेन करन (इंग्लंड/झिम्बाब्वे)


या तिघांचा जन्म भारतात झाला असला तरी त्यांनी इंग्लंड आणि झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले.



6.केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)


भारतीय वंशाचे असलेले केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे महत्त्वाचे फिरकी गोलंदाज आहेत.



7.सुनील नारायण (वेस्ट इंडिज)


त्यांचे कुटुंब मूळ भारतीय वंशाचे आहे. त्यांनी वेस्ट इंडिजसाठी जागतिक स्तरावर नाव कमावले.



ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्ध टी-20 संघ


मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, निखिल चौधरी, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, जोएल डेव्हिस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुहनेमन, रायली मेरेडिथ, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ आणि ॲडम झाम्पा.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून