Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजने मोडला विराट कोहलीचा जागतिक विक्रम! या खास यादीत आता नंबर वन

मुंबई : भारत अ संघाचा कर्णधार ऋतुरााज गायकवाड सध्या श्रीलंकेत चालू  ट्राई सिरीज मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने 66 धावांची दमदार खेळी करत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीसह ऋतुराजने भारतीय दिग्गज विराट कोहलीचा जागतिक विक्रम मोडत लिस्ट ए क्रिकेटमधील एका खास यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या ऋतुराजच्या विक्रमाची क्रिकेट विश्वात सुरु आहे.



कोहलीचा विक्रम मोडण्यात यश


लिस्ट ए क्रिकेटमध्ये किमान 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम आता ऋतुराज गायकवाडच्या नावावर झाला आहे. ऋतुराजने 59.39 च्या सरासरीने 5227 धावा केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे.विराट कोहलीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 57.91 सरासरीने 16,447 धावा केल्या आहेत.मात्र आता ऋतुराजने त्यालाही मागे टाकले आहे.



लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी (किमान 5000 धावा)


1. ऋतुराज गायकवाड – 59.39 (5227 धावा)


2. विराट कोहली – 57.91 (16447 धावा)


3. मायकल बेवन – 57.86 (15103 धावा)


4. चेतेश्वर पुजारा – 57.01 (5759 धावा)


5. खुर्रम मंजूर – 53.52 (7922 धावा)


6. एबी डिव्हिलियर्स – 53.47 (11123 धावा)


7. बाबर आझम – 53.39 (9772 धावा)


8. जेम्स टेलर – 53.39 (5365 धावा)


9. शान मसूद – 53.00 (6413 धावा)


10. सलीम इलाही – 52.30 (6277 धावा)






भारतीय फलंदाजांची दमदार खेळी, पण पावसाने फिरवले गणित !


भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यातील रोमांचक सामन्यात भारतीय फलंदाजांनी ३४९ धावांचा डोंगर उभारला होता. वैभव सूर्यवंशी (४४), प्रभसिमरन सिंग (८४), तिलक वर्मा (६६) आणि ऋतुराज गायकवाड (६६) यांच्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.मात्र, अफगाणिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसाने संपूर्ण खेळाचे चित्र बदलले. अखेर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार अफगाणिस्तानला ४ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारतीय खेळाडूंच्या मेहनतीवर पावसाने पाणी फिरवल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून