Solapur Accident : बार्शी-परंडा मार्गावर भीषण अपघात; खांडवीतील दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत

सोलापूर: परंडा-बार्शी मार्गावरील वारदवाडी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) खांडवी (ता. बार्शी) येथील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू (Death) झाला. अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे खांडवी गावावर शोककळा पसरली आहे. (Solapur Accident)



मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही शेतकरी 8 जून रोजी परंडा येथील साखर कारखान्यात उसाच्या बिलाबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. कारखान्यातील काम पूर्ण करून ते आपल्या होंडा दुचाकीवरून (एमएच 13 एफडी 7058) खांडवी गावाकडे परतत होते. यावेळी वारदवाडीजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मृत शेतकऱ्यांची नावे सर्जेराव कोंडीबा पाटील (वय 60) आणि बाबासाहेब भागवत गव्हाणे (वय 55) अशी आहेत.


धडक इतकी भीषण होती की सर्जेराव पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब गव्हाणे यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.



अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दिवसभर शेती आणि कारखान्याच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या या दोन्ही शेतकऱ्यांचा रात्री अपघातात मृत्यू झाल्याने खांडवी गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे