Ahilyanagar : जिल्हा पोलिस दलात खांदेपालट; 19 पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस दलात प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्यांची चर्चा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगली होती. अखेर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांसह नव्याने जिल्ह्यात आलेल्या 19 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे आदेश गुरूवारी सायंकाळी काढण्यात आले.



पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रॉस रेड धडाका


पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या बदल्यांची चर्चा होती. पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रॉस रेड धडाका सुरू केल्याने प्रभारी पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले होते. तर, जिल्ह्यात अवैध धंद्याला चांगलाच चाप बसला. नाशिक परिक्षेत्रातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर गुरूवारी जिल्हांतर्गत पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये पोलिस ठाण्यात दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकार्‍यांच्या प्रमुख्याने बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, वादग्रस्त कारकीर्द आणि नागरिकांच्या तक्रारी आलेल्या अधिकार्‍यांचाही बदल्यांमध्ये समावेश आहे.



कबाडी यांची कारकीर्द ठरली वादग्रस्त


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. ड्रग्ज चोरी प्रकरणात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. आयजी, डीजीकडे त्यांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. एवढंच काय तर त्यांच्या कामकाजाबद्दल विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रशासकीय बदली करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या एलसीबीची जागा रिक्त असून, तत्पुरता पदभार सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये यांच्याकडे देण्यात आला आहे.



पोलिस अधिकार्‍यांची बदली कोठून कोठे झाली ?


पोलिस निरीक्षक जगदिश भांबळ (तोफखाना पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), विलास पुजारी(पाथर्डी पोलिस ठाणे ते मानवसंसाधन विभाग) रवींद्र देशमुख (नियंत्रण कक्ष ते राहुरी पोलिस ठाणे), संभाजी गायकवाड (कोतवाली ते दहशतवाद विरोधी पथक), संजय ठेंगे (राहुरी ते श्रीगोंदा), किरण शिंदे (श्रीगोंदा ते ए.एच.टी.यू), नितीन देशमुख (श्रीरामपूर ते कोतवाली), आनंद कोकरे (मानवसंसाधन विभाग ते पाथर्डी पोलिस ठाणे), प्रताप दराडे (नियंत्रण कक्ष ते नेवासा), बाबासाहेब बोरसे (शहर वाहतूक शाखा ते घारगाव पोलिस ठाणे), महेश पाटील (नियंत्रण कक्ष ते शहर वाहतूक शाखा), दीपक सरोदे (नियंक्षण कक्ष ते राहाता पोलिस ठाणे), बालाजी वैद्य( ए.एच.टी.यू ते तोफखाना), हनुमान गायकवाड(नियंत्रण कक्ष ते कर्जत). हेमंत थोरात (घारगाव ते एमआयडीसी), सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा ते लोणी), माणिक चौधरी(एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), जगदिश मुलगीर (भिंगार कॅम्प ते आर्थिक गुन्हे शाखा), महिला सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी थोरात(कोतवाली ते भिंगार कॅम्प).

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी