Kane Williamson Retirement : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 16 वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीला पूर्णविराम

मुंबई : जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक केन विल्यमसनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीने न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स कसोटीनंतर विल्यमसनने आपल्या 16 वर्षांच्या शानदार कारकिर्दीला पूर्णविराम दिला. याआधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विल्यमसनने आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सगळ्या प्रकारांतून निवृत्ती घेतली आहे. देशासाठी खेळणे हे माझ्यासाठी स्वप्न होते. प्रत्येक सामन्यात मी माझे शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि आता योग्य वेळी निवृत्ती घेत असल्याचा मला आनंद झाला आहे, असे निवृत्तीनंतर केन विल्यमसन म्हणाला.



केन विल्यमसनची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी


केन विल्यमसन हा न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून तब्बल 19 हजार 346 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 48 आंतराष्ट्रीय शतकंही आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 9 हजार 515 तर वनडेमध्ये 7 हजार 256 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार 557 धावा केल्या आहेत.विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या स्पर्धेत तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. तसेच त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने क्रिकेट इतिहासातील पहिली ICC World Test Championship Final 2021 जिंकत इतिहास रचला होता.(FIFA WORLD CUP)





कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी प्रभावी ठरली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 40 सामन्यांत नेतृत्व करत 22 विजय मिळवले. वनडेमध्ये 91 सामन्यांत 46 विजय, तर टी-20 क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 39 विजय त्याच्या नावावर आहेत. शांत स्वभाव, उत्कृष्ट नेतृत्व आणि सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे विल्यमसनला क्रिकेटविश्वात विशेष मान मिळाला. त्याच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड क्रिकेटमधील एका सुवर्ण पर्वाचा शेवट झाला आहे. आधुनिक क्रिकेटमधील सर्वात आदर्श आणि संयमी क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून केन विल्यमसनचे नाव कायम स्मरणात राहील.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून