Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ वाहतूक व्यवस्थेला बळकटी; पेठ रोडवरील पायाभूत सुविधा उभारणी वेगात

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने घाट परिसराकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कालवा ते मेहेरधाम या सुमारे ४.७८५ किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्यावर विविध युटिलिटी कामांना गती देण्यात आली आहे.


हा मार्ग घाट परिसर, पार्किंग व्यवस्था आणि शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासोबतच भूमिगत सेवा सुविधांचे जाळे सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.



सांडपाणी व्यवस्थापन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क (ओएफसी) आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्था यांसारखी मूलभूत कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असून भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन या मार्गाचे आधुनिकीकरण केले जात आहे.सिंहस्थ काळातील वाहतूक आणि भाविक व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या या मार्गाचे उन्नतीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या ओएफसी नेटवर्कचे काम पूर्णत्वास गेले असून डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सक्षम झाल्या आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची व्यापक कामे सुरू आहेत. भविष्यात वारंवार रस्ते खोदण्याची आवश्यकता कमी करण्यासाठी विविध युटिलिटी कामांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील दीर्घकालीन वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधांना चालना मिळणार आहे.सिव्हरेज (PPP-HAM) अंतर्गत ३० मीटर क्षेत्रात काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या ओएफसी नेटवर्कचे ३,९१५ मीटरचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे ८,८६० मीटर क्षेत्रातील काम सध्या प्रगतीपथावर आहे.



वाहतूक वळविण्याची योजना


आरटीओ जंक्शन ते मेहेरधाम मार्गावरील एक बाजू बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कालवा रोड जंक्शन ते तारवाला मार्केट मार्गावरील एक बाजू बंद असून उर्वरित बाजूवर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.नकाशानुसार लाल रंग बंद मार्ग दर्शवितो, हिरवा रंग वाहतुकीसाठी खुला मार्ग दर्शवितो, तर निळा रंग पर्यायी मार्ग (डायव्हर्शन) दर्शवितो.



“सिंहस्थासाठी होत असलेली तयारी ही केवळ एका धार्मिक सोहळ्यापुरती मर्यादित नाही. या माध्यमातून शहराच्या पुढील अनेक दशकांच्या गरजांचा विचार करून पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. पेठ रोडवरील कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची क्षमता वाढेल, पावसाळ्यातील अडचणी कमी होतील आणि नागरिकांसह भाविकांनाही अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल. प्रत्येक विकासकामात गुणवत्ता, समन्वय आणि दीर्घकालीन परिणामकारकता यांना प्राधान्य दिले जात आहे.”


मनीषा खत्री ,आयुक्त नाशिक महानगरपालिका

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.