Nashik Crime : नांदगावात लाचखोरांवर एसीबीचा दणका; आयटी सहाय्यकासह दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शेतजमिनीच्या खरेदी खताच्या दस्तांची प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आयटी सहाय्यकासह दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन चुलत आजोबा व इतरांनी परस्पर विक्री केलेली असल्याने पुढील कायदेशीर लढाई करण्यासाठी त्यांना आजोबा व इतरांनी विक्री केलेल्या शेत जमिनीच्या खरेदी खतांच्या दस्तांची प्रमाणित नक्कल हवी होती. यासाठी तक्रारदाराने १८ मार्च २०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. खासगी व्यक्ती सागर बोरसे आणि आयटी सहाय्य्क धारासिंग राठोड यांंनी खरेदी खतांच्या दस्तांची प्रमाणित नक्कल प्रत काढून देण्यासाठी ३२० रुपये शासकीय शुल्क भरण्यास सांगितले.


नंतर प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात संशयितांनी १२०० रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती एक हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना संशयित राठोड व बोरसे या दोघांना पकडण्यात आले.



आयटी सहाय्यकासह दोघे ताब्यात


या कारवाईत धारासिंग बाबुलाल राठोड, वय ५३, रा. सह्याद्रीनगर, नांदगाव, हे आयटी सहाय्यक अर्थात डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि खासगी व्यक्ती सागर राजेंद्र बोरसे, वय ३३, रा. पाटोदा रोड, नांदगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन


दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी अधिकारी वा कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी एसीबीच्या शरणपूर रस्त्यावरील तिबेटियन मार्केटजवळील कार्यालयात अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांक, ०२५३-२५७५६२८, २५७८३२० तसेच व्हॉट्स ॲप ९९३०९९७७०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास या क्रमांकावर साधावा, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली