Nashik : आयुष्यभर साथ दिली अन अखेरच्या प्रवासालाही एकत्र; मनमाडमध्ये पती-पत्नीच्या निधनाने हळहळ

Nashik : मनमाड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयुष्यभर सुख-दुःखात साथ देणाऱ्या पती-पत्नीच्या नात्याचा भावनिक प्रत्यय मनमाड मध्ये पहायला मिळाला आहे. पतीच्या निधनाची बातमी समजताच अवघ्या दोन तासांत पत्नीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मनमाडमध्ये घडली आहे. एकाच दिवशी घरातून पती-पत्नी दोघांचीही अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



नेमकं काय घडलं ?


मनमाड शहरातील शांतीनगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी अर्जुन देवरे (Arjun Devare) यांच्यावर काही दिवसांपासून नाशिकमधील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या त्रासामुळे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या पत्नी सुनंदा देवरे (Sunanda Devare) या देखील कुटुंबीयांसोबत रुग्णालयात उपस्थित राहून पतीची सेवा-सुश्रूषा करत होत्या. मात्र, अर्जुन देवरे यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नव्हती. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते.



नियतीने खेळला खेळ


दरम्यान, काही आवश्यक वस्तू आणण्यासाठी सुनंदा देवरे या आदल्या रात्री मनमाडमधील (Manmad) घरी परतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाशिकला जाण्याची तयारी सुरू होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. गुरुवारी सकाळी नाशिकला जाण्याची तयारी सुरू असतानाच अर्जुन देवरे यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याची दुःखद बातमी कुटुंबीयांना मिळाली. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह मनमाडकडे आणण्यासाठी आप्तेष्ट रवाना झाले. सायंकाळी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना देण्यात आली. घरात शोककळा पसरली होती.



अखेरच्या प्रवासालाही एकत्र


मात्र, याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना घडली. पतीच्या निधनाचा जबर धक्का बसल्यानंतर सुनंदा देवरे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने मनमाडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. धक्कादायक म्हणजे, पती अर्जुन देवरे यांच्या निधनानंतर अवघ्या दोन तासांच्या आतच सुनंदा देवरे यांची प्रकृती गंभीर बनली आणि अखेर त्यांचीही प्राणज्योत मालवली. पतीचा मृतदेह घरी पोहोचण्यापूर्वीच पत्नीचाही मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला.



यापूर्वीही कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात


देवरे कुटुंबावर यापूर्वीही दुःखाचा मोठा आघात झाला होता. देवरे दाम्पत्याच्या विवाहित तरुण मुलाचे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. कुटुंबीयांनी एकुलत्या मुलाला गमावण्याचे दुःख सहन केले असतानाच आता पती-पत्नी दोघांच्याही निधनाने संपूर्ण कुटुंब हादरले आहे.देवरे दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली असून, या हृदयस्पर्शी घटनेने देवरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिकांनाही या घटनेने हेलावून टाकले आहे. आयुष्यभर एकमेकांच्या साथीने जगलेल्या पती-पत्नींची अखेरची साथही अशीच कायम राहिली, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या