Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले होणार आहे. मंदिर परिसरातील विकासकामांमुळे बंद ठेवण्यात आलेले मंदिर आता 15 जूनपासून दर्शनासाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.



विशेष म्हणजे, 15 जून रोजी अधिक मासाची सांगता होत असल्याने हा दिवस धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानला जात आहे. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मंदिरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून मंदिर बंद ठेवले होते. सुरुवातीला 31 मे रोजी मंदिर खुले करण्याचे नियोजन होते. मात्र काही कामे अपूर्ण राहिल्यामुळे मंदिर उघडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर 15 जूनपासून भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.


भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. 15 ते 30 जून या कालावधीत दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नोंदणीकृत भाविकांनाच सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे.


भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने दर्शनासाठी नोंदणी अनिवार्य केली आहे. https://shreebhimashankar.com/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे


प्रत्येक भाविकाने मंदिरात प्रवेश करताना वैध शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. तसेच दररोज केवळ 1,000 भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


भाविकांच्या सुविधेसाठी दर्शन मार्गावर बॅरिकेडिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्र तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी आपापल्या नोंदणीकृत स्लॉटनुसारच दर्शनासाठी यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.


अधिक मासाच्या अखेरच्या दिवशीच मंदिराचे दरवाजे उघडत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भीमाशंकर येथे भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी