Ind vs Afg : भारत- आफगाणिस्तान पहिल्या वनडेत ओवर कट-ऑफ जाहीर

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सलामीचा एकदिवसीय सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर होणार आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नाणेफेकही होऊ शकलेली नाही. पावसाचा विचार करता २०-२० षटकांचा सामना पूर्ण करण्यासाठी कट ऑफ वेळ जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजल्यापासून ओवर्स मध्ये कपात करण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाने विश्रांती घेतली, तर २०-२० षटकांचा सामना खेळवला जाईल. मात्र २० षटकांचा सामना होण्यासाठी संध्याकाळी ६ : ३२ ला सामना सुरू होण्याची आवश्यकता आहे.




मे महिन्यात आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यामुळे विराट कोहली या मालिकेत खेळणार नाही. हार्दिक पांड्याही संघात नाही. कोहलीच्या जागी यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे. तो आजच्या सामन्यात खेळतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ईशान किशनही संघात आहे; हे दोन्ही खेळाडू अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात न्यूझीलंडचे यजमानपद भूषवल्यानंतर भारताचा हा पहिला एकदिवसीय सामना आहे.


वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल, यशस्वी जयसवाल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, गुरनूर बराड, प्रसिद्ध कृष्णा आणि प्रिंस यादव.





वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, नांगेयालिया खरोती, ए.एम. गजनफर, बिलाल सामी, दरविश रसूली, फरीद अहमद मलिक आणि जिया उर रहमान शरीफी

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित