Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला अत्यंत कठोर शब्दांत स्पष्ट संदेश दिला आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, मानवतेच्या आणि शांततेच्या विरोधात उभ्या असलेल्या शक्तींना सिंधू नदीचे पाणी कोणत्याही परिस्थितीत मिळू दिले जाणार नाही. “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” ही भारताची ठाम भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.


पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्याच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. (Defence Minister Rajnath Singh)



‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख; शत्रूंना कठोर संदेश :


राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सैन्याच्या शौर्याचे आणि निर्णायक कारवाईचे कौतुक केले. शांततेची भाषा न समजणाऱ्या शक्तींना त्यांच्या भाषेत उत्तर देणे भारताला चांगलेच माहीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाल्यास शत्रू देशाला आवश्यक वस्तूंचा पुरवठा—अन्न आणि पाणी यासह—पूर्णपणे रोखण्याची क्षमता भारताकडे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. (Defence Minister Rajnath Singh)



भारताची जागतिक भूमिका आणि संरक्षणशक्ती :


राजनाथ सिंह यांनी भारताच्या जागतिक प्रतिमेवरही प्रकाश टाकला. कोरोना महामारीच्या काळात भारताने जगभरात लस आणि औषधांचा पुरवठा करून मानवतेची सेवा केली, याचा त्यांनी उल्लेख केला. त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केले की, जसा भारत जगासाठी विश्वासू भागीदार म्हणून उभा आहे, तसाच देश आपली सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताकडे जीवन वाचवणाऱ्या लसींसोबतच शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. (Defence Minister Rajnath Singh)

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?