Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील धारवाड-हुबळी परिसरातील गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी हिच्या खूनप्रकरणाचा उलगडा झाला असून, तिचा प्रियकर असलेल्या शिक्षकानेच लग्नाच्या आड येत असल्याच्या रागातून तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. (Crime News)


मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करण्णावर (वय 33) हा हुबळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचे आणि गंगव्वाचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र बसवराजच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न ठरविण्याचे प्रयत्न सुरू केल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. गंगव्वा या विवाहाला विरोध करत असल्याने आणि वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरत असल्याची भावना निर्माण झाल्याने बसवराजने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.



नातेवाईकांच्या मदतीने रचला कट


पोलिसांच्या माहितीनुसार, बसवराजने आपल्या वडिलांची आणि मामाची मदत घेऊन कट रचला. गंगव्वाला विश्वासात घेऊन प्रथम बेळगावला आणण्यात आले. त्यानंतर क्रुझर वाहनातून तिलारी घाट परिसरात नेऊन तिची हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर मृतदेह तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ फेकून देण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.


या प्रकरणात बसवराजसह त्याचे वडील यल्लाप्पा मल्लाप्पा करण्णावर (57) आणि मामा लगमाप्पा अंकलगी (37) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, खून करून परतत असताना आरोपींच्या क्रुझर वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या वाहनचालकावर उपचार सुरू असून त्याची चौकशी अद्याप होऊ शकलेली नाही. त्याच्याकडून या कटाबाबत आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


प्रेमसंबंध, लग्नाचा तणाव आणि त्यातून निर्माण झालेली सूडाची भावना यामुळे एका तरुणीचा बळी गेल्याने या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमातून निर्माण होणाऱ्या हिंसक प्रवृत्तीबाबतही या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,