Spain : स्पेन फिफा वर्ल्डकप २०२६ जिंकणार, AI चे भाकीत

मेक्सिको : सध्याचा युरोपियन चॅम्पियन असलेला स्पेनचा संघ 'फिफा विश्वचषक २०२६' जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे, अशी भविष्यवाणी एका नवीन 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) सांख्यिकीय मॉडेलने केली आहे. या अत्याधुनिक एआय मॉडेलने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेचे तब्बल १ लाख वेळा सिम्युलेशन (डिजिटल सराव सामने) करून हा निष्कर्ष काढला आहे. प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ अचिम झीलेस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभ्यासानुसार, स्पेनला विश्वचषक उंचावण्याची १४.५ टक्के संधी (शक्यता) देण्यात आली आहे.



एआय मॉडेलच्या विश्लेषणानुसार, अव्वल दावेदारांमध्ये युरोपियन संघांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही संघ १२.४ टक्के संधीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. जर्मनी ११.२ टक्के संधीसह जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगाल संघाला ८ टक्के संधी देण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील आणि सध्याचा 'नंबर १' असलेला गतविजेता अर्जेंटिनाचा संघ एआयच्या मते ८.२ टक्के संधीसह बराच मागे आहे.



संशोधकांनी या अंदाजासाठी 'मशिन लर्निंग' मॉडेलचा वापर केला. यामध्ये अलीकडची कामगिरी, सट्टेबाजी बाजारातील अंदाज, खेळाडूंची वैयक्तिक गुणवत्ता आणि कौशल्य महत्त्वाच्या घटकांचे विश्लेषण करण्यात आले. या डेटाच्या आधारे एआयने प्रत्येक सामन्याचे संभाव्य निकाल, गोलची संख्या, एक्स्ट्रा टाईम आणि पेनल्टी शूटआऊट या सर्व गोष्टी गृहीत धरून फिफाच्या नियमांनुसार सामन्यांचे सिम्युलेशन केले.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून