Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराला सुवर्णवैभव! अधिक मासात भाविकाकडून १.५ किलो सोन्याचा कळस दान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) नव्या सुवर्णवैभवाची भर पडली आहे. मंदिराच्या मुख्य शिखरावर गुरुवारी (११ जून) रात्री विधिवतपणे १.५ किलो वजनाचा आणि साडेतेरा फूट उंचीचा सोन्याचा कळस बसवण्यात आला. या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या सुवर्णकळसाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी होत आहे.


अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त गोव्यातील एका दानशूर भाविकाने हा सुवर्णकळस मंदिराला अर्पण केला आहे. मात्र, दानकर्त्याने नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (Kolhapur Ambabai Temple)



शिखराला तांब्याचे संरक्षण कवच :


मंदिराच्या मूळ सहा फूट उंच शिखराभोवती पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी सुमारे २०० किलो वजनाचे तांब्याचे आवरण बसवण्यात आले आहे. या आवरणावर सोन्याचा मुलामा देण्यात आल्याने शिखराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. (Kolhapur Ambabai Temple)



रात्रभर सुरू होते काम :


सोन्याचा कळस बसवण्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. क्रेनच्या साहाय्याने आणि जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने रात्रभर हे काम सुरू होते. संपूर्ण प्रक्रियेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी देखरेख ठेवली. (Kolhapur Ambabai Temple)



वैदिक मंत्रोच्चारात पूजन :


शुक्रवारी सकाळी नव्या सुवर्णकळसाचे वैदिक मंत्रोच्चारांसह पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. विविध धार्मिक विधी पार पडताच भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. (Kolhapur Ambabai Temple)



दर्शनासाठी भाविकांची गर्दी :


नवीन सुवर्णकळसामुळे अंबाबाई मंदिराच्या वैभवात भर पडली असून त्याचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येत आहेत. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. (Kolhapur Ambabai Temple)




Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,