Brazil Adventure Jump Video: ब्रिज स्विंगचा थरारक! सुरक्षा दोर न बांधताच तरुणीला हवेत सोडले; 21 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू

ब्राझील: ब्राझीलमध्ये (Brazil) एका साहसी खेळादरम्यान झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. ब्रिज स्विंगवरून उडी मारताना सुरक्षा दोर न जोडल्याने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुर्घटना ब्राझीलमधील साओ पावलो राज्यातील लिमेरा येथे घडली असून साहसी खेळांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Adventure Jump Video)


मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने 'ब्रिज स्विंग' या थरारक उपक्रमासाठी नोंदणी केली होती. या उपक्रमात सहभागी व्यक्तीला हार्नेस आणि सुरक्षा दोराच्या मदतीने 40 मीटरहून अधिक उंचीवरून हवेत झुलवले जाते. मात्र प्राथमिक तपासात कर्मचाऱ्यांनी सुरक्षा दोर व्यवस्थित जोडण्यापूर्वीच तिला प्लॅटफॉर्मवरून सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.



प्रत्यक्षदर्शींच्या मते, तरुणी हवेत सोडल्यानंतर काही क्षणांतच काहीतरी चुकीचे घडत असल्याचे लक्षात आले. उपस्थितांनी आरडाओरडा करून इशारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


विशेष म्हणजे, या साहसी अनुभवाबाबत तरुणी अत्यंत उत्साही होती. उडी मारण्यापूर्वी तिने काही फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर केले होते. मात्र काही क्षणांतच हा आनंददायी अनुभव दुःखद दुर्घटनेत बदलला. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी व्यवस्थापकावर आणि कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीचा जीव गेला अशी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.





घटनेनंतर आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.



या घटनेनंतर संबंधित साहसी केंद्राच्या सुरक्षा प्रक्रियेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून उपकरणे, कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल तपासणी केली जात आहे. या दुर्घटनेमुळे साहसी खेळांमधील सुरक्षेच्या मानकांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या