Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे... अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्यासोबतच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आता मौनीने तिच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या अफवांवर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.


अलीकडेच  मोनिका शर्मा (Monika Sharma) यांच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत मौनी रॉयने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि अफवांबाबत भाष्य केले. तिच्याबद्दल पसरलेल्या सर्वात विचित्र अफवेबद्दल विचारले असता ती म्हणाली, "अरे, ती अफवा की मी गे आहे. पण मला सगळ्यांना सांगायचे आहे की मी गे नाही आहे."



गेल्या काही काळात सोशल मीडियावर काही युजर्सनी मौनीचे नाव अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिच्यासोबत जोडले होते. त्यानंतर तिच्या लैंगिकतेबाबत विविध चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, मौनीने या सर्व अफवांना हलक्याफुलक्या शैलीत उत्तर देत त्याकडे फारसे लक्ष न देण्याचा संकेत दिला.


यावेळी तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही मोकळेपणाने संवाद साधला. वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मात्र कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे ती त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकली, असे तिने सांगितले.


मौनी म्हणाली, "मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्याकडे असे मित्र आणि कुटुंब आहे, जे प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी कठीण प्रसंगांना सामोरे जाऊ शकले."



तिने विशेषतः आपल्या मैत्रिणींचे कौतुक करत सांगितले की, "चांगला काळ असो किंवा वाईट, माझ्या मैत्रिणी नेहमी माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आयुष्यात अशा मजबूत आणि प्रेरणादायी स्त्रिया असणे खूप महत्त्वाचे असते."


दरम्यान, मौनीच्या या वक्तव्यानंतर तिच्याबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ