Beed Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; मुलगी गर्भवती, तीन जणांना अटक

बीडच्या माजलगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार (Beed Crime news) बीडमध्ये घडला आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या घरच्यांच्या संमतीने हा विवाह झाल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात मुलीच्या आई-वडिलांसह नवरा, सासू आणि सासरे अशा पाच जणांविरोधात माजलगाव (Majalgaon Crime News) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेसोबत शारिरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध बलात्कार (Crime News) आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Majalgaon Crime News)



डॉक्टरांनी सर्व प्रकार उघडकीस आणला :


बीडच्या माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यातील एका  तरुणा सोबत लावून दिला. ९ जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या असं लक्षात आलं संबंधित मुलगी अल्पवयीन आहे. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या वयाची तपासणी केली. ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी अल्पवयीन आहे आणि पिडीतेसोबत शारिरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध बलात्कार करण्याबाबत पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस तसेच महिला सुरक्षा पथकाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण