Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या संशयातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Akola Murder Case)


ही घटना रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तार फैल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. मृत तरुणाचे नाव अंकुश गोपालनंदा गवली (वय 29) असे असून तो अशोक नगर परिसरातील रहिवासी होता.



मिळालेल्या माहितीनुसार, अंकुशचा काही व्यक्तींशी मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असताना दोन जणांनी त्याला गाठले. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने अंकुशवर सपासप वार केले.


गंभीर जखमी झालेला अंकुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अंकुशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिरीष खंडारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.



दरम्यान, या हत्येमागे जुना वाद आणि अनैतिक संबंधांशी संबंधित कारणे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने