Kalyan Accident : पत्नीला माहेरी सोडून परतताना काळाचा घाला! घरापासून काही अंतरावर रील स्टार प्रेम भाटीचा अपघाती मृत्यू











Kalyan Accident : कल्याण : कल्याण (Kalyan) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला माहेरी सोडून अवघ्या काही मिनिटांत घरी पोहोचणार असलेल्या तरुणाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. प्रेम भाटी (Prem Bhati) असे मृत तरुणाचे नाव असून तो सोशल मीडियावरील रील्समुळे परिसरात चांगलाच परिचित होता. (Accident News)



मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी याच्या पत्नीच्या भावाची प्रकृती बिघडल्याने तो पत्नीला कल्याणमधील योगिधाम परिसरात तिच्या माहेरी सोडण्यासाठी गेला होता. पत्नीला सुरक्षितपणे माहेरी सोडल्यानंतर तो रात्री उशिरा मोहने येथील आपल्या घराकडे परतत होता.


रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तो घरापासून काही अंतरावर असताना त्याच्या वडिलांनी फोन करून तो कुठपर्यंत पोहोचला याची विचारपूस केली. त्यावेळी प्रेमने "दहा मिनिटांत घरी पोहोचतो," असे सांगितले होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.


घरी पोहोचण्याआधीच रस्त्याच्या कडेला कामासाठी साठवून ठेवलेल्या खडीवरून त्याच्या दुचाकीचा तोल गेला. दुचाकी घसरल्याने प्रेम रस्त्यावर जोरात कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.


घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत प्रेमला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



या अचानक घडलेल्या घटनेमुळे भाटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही मिनिटांत घरी परतण्याचे आश्वासन देणारा मुलगा कायमचा निघून गेल्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या खडीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.





Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने