दिवाळीपूर्व मुंबईतील प्रमुख रस्ते धुळमुक्त? BMC ची विशेष स्वच्छता मोहिम

मुंबई महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवार, 29 ऑक्टोबर ते शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रामुख्याने जेव्हीएलआर, एससीएलआर, बीकेसी कनेक्टर, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच धूळप्रवण असल्याचे निश्चित करण्यात आलेल्या इतर मार्गांवर राबवण्यात येणार आहे.



महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त किरण दिघावकर नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवार,29 ऑक्टोबर ते शुक्रवार,6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.



या विशेष मोहिमेसाठी सर्व सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांना मनुष्यबळ व यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या मोहिमेत या प्रमुख मार्गांवर साचलेली धूळ, गाळ व बांधकाम आणि पाडकाम (सी अँड डी) कचरा हटविणे, दुभाजक, मध्यभाग (मीडियन), पदपथ व कर्बस्टोन यांची स्वच्छता करणे; तसेच आवश्यकतेनुसार पाण्याची फवारणी व मिस्टिंग करणे, याबाबत सविस्तर कार्यान्वयन सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.



सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांनी त्यांच्या संबंधित सहायक आयुक्तांच्या समन्वयाने दैनंदिन कृती आराखडा तयार केला आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेत समाविष्ट केलेली ठिकाणे, तैनात केलेली यंत्रसामग्री, गोळा केलेले कचऱ्याचे प्रमाण तसेच जिओ-टॅग केलेली 'आधी व नंतर' छायाचित्रे यांचा समावेश असेल.

Comments
Add Comment

मुंबईतील आरएमसी प्लांटवरील कारवाई मोहिमेला महापौरांच्या वॉर्डापासून सुरुवात; महापालिकेच्या एन विभागातील ७ प्लांटना नोटीस, कठोर कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणाच्या

Mumbai News: क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपा! महापौर रितू तावडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक

महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’ सुरू; मुंबई-पुण्यात उद्यापासून ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सव!

मुंबई:

Matheran Toy Train Resumes: 'माथेरानची राणी' पुन्हा रुळावर धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे

मुंबई लोकलचा अनोखा डबा! आता सामान्य तिकीट काढून घ्या फर्स्ट क्लासचा आनंद

मुंबई लोकल म्हटली की डोळ्यांसमोर येते ती अलोट गर्दी. या रोजच्या गर्दीतून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रवासी

ससून डॉकचा कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवणार - मंत्री नितेश राणे; कोळंबी सोलणाऱ्या मच्छीमार महिलांना सुरक्षा किटचे वाटप

मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.