Matheran Toy Train Resumes: 'माथेरानची राणी' पुन्हा रुळावर धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन आता पुन्हा सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या शुक्रवारपासून (30 ऑक्टोबर) नेरळ- माथेरान मार्गिकेवर पुन्हा रेल्वे सुरू होणार आहे. संरक्षेच्या कारणास्तव, पावसाळ्याच्या काळात (जून ते ऑक्टोबर) नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली होती. मात्र, माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू राहते. पण येत्या शुक्रवारपासून नेरळ ते माथेरान रेल्वे सेवा पुन्हा सुरू होत आहे.


नेरळ- माथेरान आणि अमन लॉज- माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांचे वेळापत्रक


नेरळ– माथेरान– नेरळ मिनी ट्रेन सेवा


नेरळ- माथेरान डाउन गाड्या

  • गाडी क्रमांक 52103: नेरळ स्थानकावरून दररोज सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि माथेरान स्थानकावर सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 52105: नेरळ स्थानकावरून दररोज सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि माथेरान स्थानकावर दुपारी 01.05 वाजता पोहोचेल.


माथेरान– नेरळ अप गाड्या

  • गाडी क्रमांक 52104: माथेरान येथून दररोज दुपारी 02.45 वाजता सुटेल आणि नेरळ स्थानकावर सायंकाळी 05.30 वाजता पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 52106: माथेरान येथून दररोज दुपारी 4 वाजता सुटेल आणि नेरळ स्थानकावर 06.40 वाजता पोहोचेल.



  1. गाडी क्रमांक 52103/52104 मध्ये एकूण 6 डबे असतील, ज्यामध्ये 3 द्वितीय श्रेणी, 1 विस्टाडोम डबा आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.

  2. गाडी क्रमांक 52105/52106 मध्ये एकूण 6 डबे असतील, ज्यामध्ये 3 द्वितीय श्रेणी, 1 प्रथम श्रेणी आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.



(ब ) अमन लॉज– माथेरान– अमन लॉज शटल सेवा (दररोज)


अमन लॉज– माथेरान शटल सेवा (दररोज)

  1. गाडी क्रमांक 52153: अमन लॉज येथून सकाळी 08.45 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर सकाळी 09.03 वाजता पोहोचेल.

  2. गाडी क्रमांक 52155: अमन लॉज येथून सकाळी 09.35 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर 09.53 वाजता पोहोचेल.

  3. गाडी क्रमांक 52157: अमन लॉज येथून दुपारी 12 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 12.18 वाजता पोहोचेल.

  4. गाडी क्रमांक 52159: अमन लॉज येथून दुपारी 02.25 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 02.43 वाजता पोहोचेल.

  5. गाडी क्रमांक 52161: अमन लॉज येथून दुपारी 03. 40 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 03.58 वाजता पोहोचेल.

  6. गाडी क्रमांक 52163: अमन लॉज येथून सायंकाळी 05.45 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर 06.03 वाजता पोहोचेल.


शनिवार/रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील-

  • विशेष-1: अमन लॉज येथून सकाळी 10.30 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर सकाळी 10.48 वाजता पोहोचेल.

  • विशेष-3: अमन लॉज येथून दुपारी 01.35 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 01.53 वाजता पोहोचेल.


माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दररोज)

  1. गाडी क्रमांक 52154: माथेरान स्थानकावरून सकाळी 08.20 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 08.38 वाजता पोहोचेल.

  2. गाडी क्रमांक 52156: माथेरान स्थानकावरून सकाळी 09.10 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 09.28 वाजता पोहचेल.

  3. गाडी क्रमांक 52158: माथेरान स्थानकावरून सकाळी 11.35 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 11.53 वाजता पोहोचेल.

  4. गाडी क्रमांक 52160: माथेरान स्थानकावरून दुपारी 2 वाजता सुटेल, अमन लॉज येथे दुपारी 2.18 वाजता पोहोचेल.

  5. गाडी क्रमांक 52162: माथेरान स्थानकावरून दुपारी 3.15 वाजता सुटेल, अमन लॉज येथे 3.33 वाजता पोहोचेल.

  6. गाडी क्रमांक 52164 माथेरान स्थानकावरून सायंकाळी 05.20 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सायंकाळी 05.38 वाजता पोहोचेल.


शनिवार/ रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील-

  • विशेष-2: माथेरान स्थानकावरून सकाळी 10.05 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 10.23 वाजता पोहोचेल.

  • विशेष-4: माथेरान स्थानकावरून दुपारी 01.10 वाजता सुटेल, अमन लॉज येथे दुपारी 01.28 वाजता पोहोचेल.


प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
Comments
Add Comment

मुंबई लोकलचा अनोखा डबा! आता सामान्य तिकीट काढून घ्या फर्स्ट क्लासचा आनंद

मुंबई लोकल म्हटली की डोळ्यांसमोर येते ती अलोट गर्दी. या रोजच्या गर्दीतून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रवासी

ससून डॉकचा कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवणार - मंत्री नितेश राणे; कोळंबी सोलणाऱ्या मच्छीमार महिलांना सुरक्षा किटचे वाटप

मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी; मुकेश अंबानींनी घेतले बाप्पाचे दर्शन

मुंबई: जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली असून, गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जिओचा शेअर

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने परस्पर निर्णय देत ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा

मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे - पांजरापूर मधील येवई येथील महासंतुलक

Mahaparinirvan Din 2026: महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासन सज्ज! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या