Pune News: पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनांमुळे टर्मिनल परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन आता १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाहन उभे ठेवल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.



यासंदर्भातील प्रस्ताव विमानतळ प्रशासनाने दिल्ली येथील मुख्यालयाकडे पाठवला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


सध्या पुणे विमानतळावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी खासगी वाहनांनी विमानतळावर येतात. मात्र, अनेकदा प्रवाशांची वाट पाहत वाहनचालक टर्मिनलसमोर बराच वेळ वाहन उभे ठेवतात. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण होते.


या कोंडीचा फटका विमान पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांनाही बसतो. वेळेत टर्मिनलपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच विमानतळ परिसरातील इतर वाहनांच्या हालचालींवरही त्याचा परिणाम होतो.



विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, वाहनांच्या प्रवेश आणि निर्गमन वेळेची नोंद ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याद्वारे १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल.


या निर्णयामुळे विमानतळ परिसरातील अनावश्यक गर्दी कमी होऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. तसेच प्रवाशांना वेळेत विमानतळावर पोहोचणे अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा