FIFA World Cup 2026 : जपानचे शेवटच्या क्षणी दमदार पुनरागमन; नेदरलँड्सविरुद्ध २-२ बरोबरीत रंगला थरार

फिफा विश्वचषकातील गट फेरीतील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक ठरलेल्या लढतीत जपानने अखेरच्या क्षणी गोल करत नेदरलँड्सविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. टेक्सासमध्ये तब्बल ६९,२८५ प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात जपानने दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करत महत्त्वाचा एक गुण मिळवला. (FIFA World Cup 2026)


पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सावध खेळ केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये सामन्याला खरी रंगत आली. ५१व्या मिनिटाला नेदरलँड्सचा कर्णधार व्हर्जिल व्हॅन डायक याने शानदार हेडरद्वारे संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, जपानने अवघ्या सहा मिनिटांत प्रत्युत्तर देत केइतो नाकामुराच्या गोलच्या जोरावर सामना १-१ असा बरोबरीत आणला. (FIFA World Cup 2026)


यानंतर ६४व्या मिनिटाला क्रायसेन्सिओ समरव्हिलने अप्रतिम कर्लिंग शॉट मारत नेदरलँड्सला पुन्हा २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना नेदरलँड्सच्या बाजूने झुकला असल्याचे वाटत असतानाच ८९व्या मिनिटाला जपानच्या दाइची कामादाने कॉर्नरवरून आलेल्या चेंडूवर गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. (FIFA World Cup 2026)



सामन्यानंतर जपानचे प्रशिक्षक हाजिमे मोरियासू यांनी संघाच्या जिद्दीचे कौतुक केले. "बरोबरीने आम्ही पूर्णपणे समाधानी नाही. मात्र नेदरलँड्स हा जागतिक दर्जाचा संघ आहे. आम्ही त्यांच्याशी तोडीस तोड लढलो. खेळाडूंनी संयम राखला आणि शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती दाखवली," असे त्यांनी सांगितले. (FIFA World Cup 2026)


दुसरीकडे नेदरलँड्सचे प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी विजय हुकल्याची खंत व्यक्त केली. "आम्ही जिंकलो नाही याची निराशा आहे. मात्र संघाच्या कामगिरीबाबत मी फारसा नकारात्मक नाही. या संघाने मोठी प्रगती केली आहे. स्पर्धेदरम्यान आम्हाला आणखी सुधारणा करावी लागेल," असे कोमन म्हणाले. (FIFA World Cup 2026)


सामन्याच्या सुरुवातीलाच नेदरलँड्सने आक्रमक खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या. डोनिएल मालेनने केलेल्या प्रयत्नांवर जपानचा गोलरक्षक झायॉन सुझुकीने शानदार बचाव केला. जपानी चाहत्यांच्या प्रचंड उत्साहामुळे स्टेडियममध्ये वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. (FIFA World Cup 2026)



या निकालामुळे गट फेरीतील समीकरणे अधिक रंजक बनली असून जपानचा पुढील सामना ट्युनिशियाविरुद्ध होणार आहे. तर गटातील दुसऱ्या सामन्यात स्वीडन आणि ट्युनिशिया आमनेसामने येणार आहेत. (FIFA World Cup 2026)

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात