Rebel TMC MP : तृणमूलच्या बंडखोर खासदारांचा गट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’त विलीन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. तृणमूलमधून बाहेर पडलेल्या २० बंडखोर खासदारांच्या गटाने रविवारी ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षात विलीन होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतर बंडखोर गटाने केंद्र सरकारमधील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.



बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन एनसीपी पक्षात विलीन झाल्याचे आणि एनडीएला पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यातील कायदेशीर गुंतागुंत आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी बंडखोर टीएमसी खासदारांनी या नोंदणीकृत पक्षासोबत जाण्याचा पर्याय निवडला.



ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ खासदार सुदीप बंडोपाध्याय आता बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे बंडखोर गटाची ताकद प्रचंड वाढली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडोपाध्याय यांनी थेट ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले. ते म्हणाले, “आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षात अधिकृतपणे विलीन झालो आहोत. आता खरी टीएमसी कोणती, याचा फैसला न्यायालयातच केला जाईल.” बंडखोर खासदार आणि आमदारांच्या आग्रहास्तव आणि लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही

OBC Cabinet Sub Committee : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर ३ मंत्र्यांचा बहिष्कार

- छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश मुंबई : ओबीसी महामंडळाला योग्य प्रमाणात निधीची तरतूद केली

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) महावितरणच्या

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Drug Free Maharashtra : महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी २०२९ची डेडलाईन

- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त