काय म्हणाला प्रशिक्षक गौतम गंभीर?
पाचवा टी20 सामन्यापूर्वी ब्रॉडकास्टरने प्लेइंग 11 निवडीवरून गौतम गंभीरला प्रश्न विचारला. गौतम गंभीर म्हणाला की, संघ निवडीच्या निर्णयांबाबत माझी जबाबदारी सर्वात आधी, सर्वांना खूश करणे हे माझे काम नाही. माझे काम योग्य निर्णय घेणे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नाही. त्यासाठीच मी इथे आहे. गौतम गंभीर पुढे म्हणाला की, बाहेरील मतांपेक्षा संघाच्या प्राधान्यक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. लोकप्रिय निर्णय घेणे सोपे आहे. पण माझ्यासाठी, योग्य निर्णय घेणे आणि ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
न्यूझीलंडने पाचव्या टी20 सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र हे ...
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, भारतीय संघात एकापेक्षा एक वरचढ खेळाडू आहे. जे खेळाडू दीर्घ काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, त्यांना संघात अधिक संधी दिली पाहीजे. त्यासाठी त्यांना प्राधान्य देणं भाग आहे. इशान किशन जखमी झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला मालिकेत संधी दिली गेली. त्याने दोन सामने खेळले. पण इशान किशन परतल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. पण शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. खासकरून फलंदाजीत भारतीय संघाने नांगी टाकल्याचं दिसून आलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असायला हवा होता, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.