ST Corporation : वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या हंगामी भाडेवाढीस १ महिन्याची मुदतवाढ

मुंबई, : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन नाईलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) कायम राहणार आहेत.



उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवासी वाहतुकीचे प्रभावी नियोजन आणि महसूलवाढीच्या उद्देशाने महामंडळाने १५ एप्रिल २०२६ पासून साध्या बससेवांच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत १५ जून २०२६ रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा विचार करता तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ लक्षात घेऊन या निर्णयास मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.



या निर्णयानुसार साधी व मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर ११.०५ रुपये कायम राहणार असून, किमान प्रवासभाडे प्रौढ प्रवाशांसाठी १४ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये असेच राहील.
महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या