Nashik : नाशिक विभागात केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक; पाणी जपूनच वापरा

Nashik : राज्यात अद्याप तरी पावसाचे प्रमाण अपुरे आहे. त्यामुळे राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, ३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी दिले आहेत.



केवळ २६ टक्के उपयुक्त जलसाठा


पुणे येथील सिंचन भवन येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी नाशिकसह राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेत प्रशासनाला कठोर उपाययोजनांचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक विभागातील (Nashik Division) प्रकल्पांमध्ये सध्या केवळ २६ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


या पार्श्वभूमीवर, नाशिकसह मराठवाडा त्यासोबतच अहिल्यानगर विभागात देखील उपलब्ध असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. धरणांमध्ये पाण्याची नवीन आवक सुरू होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.



बेकायदेशीर पाणी उपसा मग कारवाई होणार


पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी बेकायदेशीर पाणी उपशावर आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) संयुक्त पथकामार्फत मोहीम राबवून कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. उपलब्ध जलसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.



प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा


मान्सूनच्या अनिश्चिततेचा विचार करता, प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाणी नियोजन आराखडा तयार करणे, ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीची पावले उचलणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करणे


जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पावसाची स्थिती पाहता, नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल