Navnath Ban: "संजय राऊतांनी ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन गिधाड करावे" – नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई, 15 जून : भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका करत "ऑपरेशन टायगर" ऐवजी "ऑपरेशन गिधाड" करण्याचा सल्ला दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

संजय राऊत यांची प्रवृत्ती गिधाडासारखी असून ते नेहमी इतरांच्या अपयशावर आणि अडचणींवर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचेच "ऑपरेशन गिधाड" महाराष्ट्रातील जनतेने केले असून त्यांना राजकीयदृष्ट्या मरणासन्न अवस्थेत आणले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा कारभार फेसबुक लाईव्ह आणि आभासी माध्यमांतून चालवला गेला, असा आरोप करत बन यांनी सांगितले की, आता त्यांच्याच पक्षातील खासदार व्हर्च्युअल पद्धतीने बैठकींना उपस्थित राहून पक्ष नेतृत्वाला ठेंगा दाखवत आहेत. भविष्यात जनताही त्यांना "व्हर्च्युअली मतदान" करून घरी बसवेल, असेही ते म्हणाले.


मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे समर्थन


मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या भारत-पाकिस्तान संबंधांबाबतच्या वक्तव्याचे समर्थन करत बन यांनी सांगितले की, शेजारी राष्ट्रांशी चर्चेतून प्रश्न सोडवणे आवश्यक असते. या भूमिकेवर संजय राऊत यांनी केलेली टीका ही मूर्खपणाची असल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी "ऑपरेशन सिंदूर" संदर्भातील पुरावे मागण्याच्या भूमिकेवरही टीका केली. देशातील जनता भाजपासोबत असून पाकिस्तानविरोधी भूमिका घेते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"शंभर जन्म घेतले तरी भाजपाचा एक नगरसेवकही फुटणार नाही"




नवनाथ बन यांनी पुढे दावा केला की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाला फोडण्यासाठी विविध प्रयत्न झाले. मात्र भाजपाचे कार्यकर्ते, आमदार आणि खासदार हे राष्ट्र प्रथम या विचारसरणीवर काम करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी शंभर वेळा जन्म घेतला तरी भाजपाचा एक नगरसेवकही फुटणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपा हा विचारांवर चालणारा पक्ष असून त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या विचारांतून मिळते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची टीकाही केली.
Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून