Satara-Sangli : मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील 'झेडपी'तील धक्काबुक्कीचा बदला घेणार?

 महायुतीत बिनसले; सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून भाजप-शिवसेनेत धुसफूस


मुंबई : स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात महायुतीमधील अंतर्गत कलह कमालीचा उफाळून आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय गणिते पाहता, 'झेडपी'तील धक्काबुक्कीचा बदला घेण्याची तयारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.



काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेत (झेडपी) झालेल्या धक्काबुक्कीची आणि राजकीय वर्चस्ववादाची पार्श्वभूमी या संघर्षाला लाभल्याची चर्चात आहे. या पार्श्वभूमीवर, नुकतीच १३ जून रोजी कराड येथे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपने महायुतीच्या समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे नेते उपस्थित होते. मात्र, या समन्वय बैठकीकडे शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील या दोघांनीही पाठ फिरवली.


या संपूर्ण वादावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. ते म्हणाले, "पालकमंत्री म्हणून मी यापूर्वी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी सर्व पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. एकीकडे पालकमंत्री समन्वय साधत असताना तुम्ही फिरकत नाही आणि दुसरीकडे त्याच बैठकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची एकतर्फी घोषणा करता; तुमचा जर हाच प्रतिसाद असेल, तर आम्हालाही आमची भूमिका बदलावी लागेल. आता निर्माण होणाऱ्या कोणत्याही राजकीय परिस्थितीला केवळ भाजपलाच सामोरे जावे लागेल," असा इशारा देसाई यांनी दिला.




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार?


सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आपल्याकडील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र करत थेट 'पर्यटनासाठी' सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी सुरू केली आहे. यावर बोलताना देसाई यांनी, भाजप काय करतेय याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमची कोअर कमिटीची बैठक पार पडली असून, उद्या आम्ही आमच्या सर्व स्थानिक सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली आहे. या बैठकीत सदस्यांची जी भावना असेल, ती आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू आणि अंतिम निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल," असे स्पष्ट केले. मात्र, ऐन मतदानाच्या तोंडावर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सातारा आणि सांगलीतील राजकीय समीकरणे महायुतीसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.