Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू खरातने महिलांवर अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भोंदू खरातने महिलांचे शोषण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अशोक खरात प्रकरणी आज मोठी सुनावणी होणार आहे. या खटल्यासाठी सरकारने अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी तकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्याकडे राज्यातील इतर महत्त्वाच्या खटल्यांची जबाबदारी असल्याने अशोक खरात प्रकरणात ते पहिल्यांदाच सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी नाशिकमध्ये आले आहेत. (Ashok Kharat Case Update)
Nashik Trimbakeshwar News : श्रावण सोमवारनिमित्त विविध शिव मंदिरात भाविक गर्दी करताना दिसून येत आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारी ...
खरातवर 17 गुन्हे दाखल
लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात (Ashok Kharat Case Update) सध्या कारागृहात आहे. मार्च महिन्यात अशोक खरातचे काळे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यापैकी १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. दरम्यान, तपास यंत्रणेकडून पुरावे व साक्षीदारांची माहितीही संकलित करण्यात आली आहे. खरात प्रकरणात नियमित सुनावणी सुरू झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) स्वतः सरकार पक्षाची बाजू मांडणार असल्याने या खटल्यातील सुनावणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Ashok Kharat Case Update)
पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अग्निशमन ...
आज होणार कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Court) अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. तपास यंत्रणेकडून पुरावे आणि साक्षीदारांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. सरकार पक्षाकडून खरातच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे. पीडितांसह नाशिकरांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.