Jalgaon Crime : जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुण रुग्णालयात तर मुख्य आरोपी मोकाट

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या अवैध व्यावसायांनी उच्छाद मांडला आहे. कुऱ्हाड तांडा येथे २४ एप्रिल रोजी अवैध व्यवसायांच्या तक्रारीच्या कारणावरून एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो तरुण जबर जखमी झाल्याने त्याच्यावर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तो तरुण जीवनाशी झुंज देत आहे.


या हल्ला प्रकरणात सामील आरोपी अटक करण्यात आले होते. तर मुख्य आरोपी हा घटना घडल्या पासून फरार होता. असे असतांना या खुनी प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केल्याचे समजते. जीवावर बेतलेल्या आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला तरुण उपचार घेत असताना त्याच्या मारेकऱ्याला जामीन मंजूर झाल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबामध्ये तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला आहे. न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत पीडित कुटुंबाने जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत येत्या १९ तारखेला सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली असून संशय निर्माण झाला आहे.



नेमकं काय घडलं होतं ?


कुऱ्हाड तांडा येथे तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ल्यात त्याच्या पोटाच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. तरुण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती आजही चिंताजनक आहे. त्याच्यावर २४ एप्रिल पासून उपचार सुरू आहे. या प्रकरणी सहा जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपासादरम्यान काही आरोपींना अटक करण्यात आली, तर अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. मात्र मुख्य आरोपी हा हल्ला केल्यापासून फरार झाला होता.



आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची चर्चा असतांनाच त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाल्याचे बोलले जात आहे. या बाबत न्यायालयीन आदेशाची प्रत उपलब्ध नसल्याने पोलिस प्रशासनाकडून जामीन बाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की, आरोपी फरार असताना देखील त्यांच्यावर दबाव आणि धमक्या देण्याचे प्रकार सुरू असून आता तर आरोपीला जामीन मिळाल्यामुळे जिवाला धोका धोका निर्माण झाला आहे. जखमी तरुणाची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने त्याच्यावर आणखी एक मोठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.


जळगाव येथे पत्रकार परिषद घेत पीडित कुटुंबातील सदस्यांनी आपली व्यथा मांडली असून गेल्या दीड ते दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. तर दुसरीकडे आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्याची शंका उपस्थित केली आहे. आम्हाला न्याय पाहिजे मुख्य आरोपीचा जमीन रद्द करण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय् मिळेल अशी पावले उचलावी अन्यथा १९ जून रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.