Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारूनही शंभूराज देसाईंच्या मनाविरुद्ध घडले

 सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक; महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश


मुंबई : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीमध्ये उफाळून आलेला अंतर्गत कलह मंत्रालयापर्यंत पोहोचला. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे संतप्त झालेले राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. मात्र, या बैठकीला गैरहजर राहून दबावाचे राजकारण करण्याचा देसाईंचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात हस्तक्षेप करत, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करावे, असा सक्त आदेश दिला आहे. त्यामुळे शंभूराज देसाई यांना अखेर आपल्या मनाविरुद्ध जाऊन महायुतीचा धर्म पाळावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..(Vaibhav Sooryvanshi)


सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीकडून भाजपने धैर्यशील कदम यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभयसिंह जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू आहे. या राजकीय संघर्षाला सातारा जिल्हा परिषदेत (झेडपी) काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्काबुक्कीची आणि स्थानिक वर्चस्ववादाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली होती. १३ जून रोजी कराड येथे भाजपने बोलावलेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे या दोन्ही मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.



एकनाथ शिंदेंचे आदेश काय?


या पार्श्वभूमीवर, मंत्री देसाई यांनी सोमवारी साताऱ्यात शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांच्या या भावनांचा सविस्तर अहवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. "शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, फक्त आमची नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचावी," अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.मात्र, हा अहवाल हाती पडताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही सबब ऐकून न घेता, "सातारा-सांगली निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे, एकही मत फुटता कामा नये," असा आदेश शंभूराज देसाई यांना दिला.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.