Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर

मुंबई, : राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला.


बैठकीत शिवनीबांध मत्स्य बीज केंद्र भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव, मोर्शी (जि. अमरावती) येथील मत्स्यव्यवसाय व जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्यासाठी प्लुटस सर्व्हिसेस या ठेकेदारास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव तसेच शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, धोम (ता. वाई, जि. सातारा) हे व्हीआरपी फिशरी प्रायव्हेट लिमिटेड यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.



तसेच शाश्वत विकास ध्येये अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, ससून डॉक सामंजस्य करारानंतरची कार्यवाही, मरोळ मच्छिमार मार्केट विकासाचा प्रगती अहवाल तसेच मच्छिमार महिलांसाठी हँडग्लोज व गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला.





यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळ (जाहिरातींच्या प्रदर्शनाचे विनियमन) विनियम, २०२६ तसेच स्टॉल व जमीन भाडेपट्ट्याने देण्यासंबंधीच्या विनियमांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करण्यात आली. मुंबई वॉटर मेट्रोसाठी पीएमसी नियुक्तीची सद्यस्थिती, वर्सोवा जेट्टीच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्रवासी जेट्टींवरील सुविधा सुधारणा, विजयदुर्ग व जयगड येथे प्रस्तावित शिपयार्ड प्रकल्प, मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी ऑनलाइन तिकीट वितरण प्रणाली तसेच ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट यूज पॉलिसी’ याबाबतही सविस्तर चर्चा झाली.



मंत्री नितेश राणे यांनी सर्व विषयांचा सविस्तर आढावा घेत कामांची सद्यस्थिती तपासली. प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करण्यात यावी तसेच विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक वेग देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


बैठकीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप,महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Food And Drug Administration : FDA ची राज्यभरात मोठी कारवाई; 7 महिन्यांत 152.65 कोटींचा अन्नसाठा जप्त, 1,688 जणांना अटक

मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये

IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले.

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास