FIFA World Cup 2026 : इराणचे दमदार पुनरागमन; न्यूझीलंडविरुद्ध सामना २-२ बरोबरीत

कॅलिफोर्निया: फिफा वर्ल्ड कप 2026 ग्रुप- G च्या सामन्यात इराण आणि न्युझीलंडमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. दोनदा मागे पडल्यानंतर इराणने जिद्दीने पुनरागमन करत पराभव टाळला, तर न्यूझीलंडला आघाडी मिळूनही विजय हातातून निसटला आणि सामना २-२ च्या बरोबरीत संपला.


या सामन्यात न्युझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत करीत इराणवर दबाव टाकलं.न्युझीलंडने आक्रमक भूमिका घेत सामन्याच्या सातव्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवली.अनुभवी स्ट्रायकर एलिजाह वुड याच्या उत्कृष्ट पासवर एलिजाह जस्ट याने अचूक फिनिश करत न्यूझीलंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र इराणने हार मानली नाही ३२ व्या मिनिटाता इराणच्या रामीन रेझाएयनने गोल करीत संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली.


पुन्हा जस्टचा वार,पण इराणचे आणखी एक पुनरागमन


दुसऱ्या हाफमध्ये न्यूझीलंडने पुन्हा आघाडी घेतली. पुन्हा एकदा एलिजाह वुड आणि एलिजाह जस्ट यांची जोडी चमकली. वुडच्या अचूक पासवर जस्टने वैयक्तिक दुसरा गोल करत न्यूझीलंडला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.परंतु इराणने यानंतरही संघर्ष कायम ठेवला.रेझायनने उजव्या बाजूने केलेल्या अचूक क्रॉसवर मोहम्मद मोहेब्बी याने जबरदस्त हेडर मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि सामना 2-2 असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत सुटळ्याने दोन्हीही संघांना एक- एक गुण मिळाला आहे.


ग्रुप-G मध्ये गुणांची विभागणी


या बरोबरीनंतर इराण आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात प्रत्येकी एका गुणाने केली. इराणसाठी रेझायन आणि मोहम्मद मोहेब्बी चमकले, तर न्यूझीलंडकडून एलिजाह जस्टने दोन गोल करत सामन्याचा हिरो ठरला. दोन्ही संघांच्या जिद्दीमुळे चाहत्यांना अखेरपर्यंत रोमांचक सामना पाहायला मिळाला.सामना बरोबरीत सुटल्यामुळे, ग्रुप- G मध्ये गुणांसाठीची लढत तीव्र होईल.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून