FIFA WORLDCUP 2026 : भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा; निशान वेलूपिल्लईच्या प्रवेशाने पुन्हा चर्चांना उधाण

फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ सध्या जगभरात सुरू आहे. युरोप आणि आफ्रिकेतील संघांची धडाकेबाज कामगिरी पाहून प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे "भारतीय फुटबॉल संघ जागतिक मंचावर कधी झळकणार?" मात्र, याच विश्वचषकात घडलेल्या एका घटनेने भारतीय फुटबॉल प्रेमींना सुखद धक्का दिला असून भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.



निशान वेलूपिल्लईने रचला इतिहास


ऑस्ट्रेलिया आणि टर्की यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात ६० व्या मिनिटाला जेव्हा ऑस्ट्रेलियाने 'निशान वेलूपिल्लई'ला मैदानावर उतरवले, तेव्हा एक नवा इतिहास घडला. गेले २० वर्षे भारतीय फुटबॉल चाहते अशा एका क्षणाची वाट पाहत होते. निशान वेलूपिल्लईचे वडील तमिळ-श्रीलंकन असून आई अँग्लो-इंडियन आहे. पिवळ्या-हिरव्या ऑसी जर्सीमध्ये मैदानात उतरलेला हा खेळाडू आज जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचा अभिमानास्पद चेहरा बनला आहे.



विकाश धोरासूची आठवण


निशान वेलूपिल्लई हा काही पहिला भारतीय वंशाचा खेळाडू नाही. याआधी बरोबर २० वर्षांपूर्वी, २००६ च्या जर्मन फुटबॉल विश्वचषकात फ्रांसच्या संघातून 'विकाश धोरासू' या खेळाडूने भारताचे नाव उंचावले होते. मूळचे विशाखापट्टणमचे असलेले विकाश जेव्हा झिनेदिन झिदान, थिएरी हेन्री आणि लिलीयन थुराम यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले होते, तेव्हा त्यांनी भारतीय चाहत्यांना भुरळ घातली होती.



भारतीय प्रतिभेला जागतिक व्यासपीठ


विकाश धोरासू असो किंवा आजचा निशान वेलूपिल्लई, या खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे की भारतीय मूळ असलेल्या खेळाडूंमध्ये जागतिक दर्जाची क्षमता आहे. क्रिकेटच्या अफाट वेडात आपण अनेकदा फुटबॉलसारख्या लोकप्रिय खेळाकडे दुर्लक्ष करतो, परंतु जेव्हा एखादा 'भारतीय' फुटबॉलच्या या महाकुंभात चमकतो, तेव्हा संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावते.


या घटनेमुळे भारतीय फुटबॉल संघ कधी विश्वचषकाच्या रिंगणात उतरणार, हा प्रश्न पुन्हा एकदा फुटबॉल प्रेमींच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त