Thane Accident : शहापूर-मुरबाड मार्गावर मिनी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी

ठाणे : शहापूर-मुरबाड (Shahapur-Murbad) मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मिनी बस (Mini Bus Accident) चालकाचा जागीच मृत्यू  (Death) झाला, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते.



मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मिनी बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून ते अलिबाग येथून नाशिककडे परतत होते. पहाटेच्या सुमारास बस शहापूर-मुरबाड मार्गावरील शेंद्रुण येथील धोकादायक वळणावर पोहोचली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला खाली उतरून अपघातग्रस्त झाली.


या अपघातात बस चालक प्रभाकर गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.


अपघातात अश्विनी आकाश काळे (वय २७), पल्लवी वाल्मीक काठावटिक (वय २८) आणि कैलास हेमंत गायकवाड (वय २२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर शेंद्रुण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.



या अपघातामुळे काही काळ शहापूर-मुरबाड मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


प्राथमिक तपासानुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत चालकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला